कालावधी : 1 एप्रिल,1992 ते 31 मार्च, 1997
मुख्यभर : मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास
प्रतिमान : पी.व्ही. राव व मनमोहन सिंग
मुख्यभर : मानवी विकास
योजना खर्च :
प्रास्तावित खर्च : 4,34,120 कोटी रु.
वास्तविक खर्च : 4,74,121 कोटी रु.
अपेक्षित वृद्धी दर – 5.6%
प्रत्यक्ष वृद्धी दर – 6.8%
विभागवार आर्थिक वाटप :
1. ऊर्जा (26%)
2. वाहतूक व दळणवळण (18%)
3. शेती व इतर (12%)
उद्दिष्ट्ये :
1. शतकाच्या अखेरपर्यंत पूर्ण रोजगाराचे उद्दीष्ट गाठण्यासाठी पुरेशा रोजगाराच्या संधि निर्माण करणे.
2. लोकसंख्या वाढीचा वेग नियंत्रित करणे.
3. 15 ते 35 वर्ष वायोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्यातील निरक्षरतेचे संपूर्ण उच्चाटन करणे.
4. सर्व खेड्यातील सर्व लोकांना स्वच्छ व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे,प्राथमिक आरोग्य सोयी-सुविधा पुरवणे, त्यांना रोगराईपासुन मुक्त करणे इ.
5. कृषि क्षेत्राचा विकास व विविधिकरण करून अन्नधान्यांच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण करणे व निर्मितीसाठी योग्य असा शेतमालाचा आढावा निर्माण करणे.
6. ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, सिंचनसोई इ सोई-सुविधा वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देवून भावी काळातील देशाच्या आर्थिक विकासाचा भक्कम पाया घालणे.
विशेष घटनाक्रम :
1. 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
2. 1992-93 मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय, 1993-94 मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय, तर 1994-95 मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला.
3. 1992 मध्ये (SEBI) ला संवैधानिक दर्जा देण्यात आला.
4. 1992 मध्ये 73 व 74 व्या घटनादुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संवैधानिक दर्जा देण्यात आला.
5. 1993-94 मध्ये खाजगी क्षेत्रात पुन्हा बँका स्थापन करण्याची संमती देण्यात आली.
6. 1996 मध्ये भारतात पहिल्यांदा डीपॉझिटची प्रणालीची सुरवात करण्यात आली.
सुरू करण्यात आलेल्या योजना :
1. राष्ट्रीय महिला कोष – 1992-93 मध्ये राष्ट्रीय महिला कोष स्थापन करण्यात आला.
2. 2 ऑक्टोंबर 1993 रोजी तीन योजना सुरू करण्यात आल्या
अ. आश्वासीत रोजगार योजना
ब. पंतप्रधान रोजगार योजना
क. महिला समृद्धि योजना – ग्रामीण महिलांमध्ये बचतीची प्रवृती वाढीस लागणे हे तिचे उद्दीष्ट आहे.
3. 23 डिसेंबर 1993 रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू करण्यात आली.
4. 15 ऑगस्ट 1995 रोजी तीन योजना सुरू करण्यात आल्या
अ. मध्यान्न आहार योजना
ब. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना
क. इंदिरा महिला योजना
No comments:
Post a Comment