चालू घडामोडी - 19 जानेवारी
Thu, 19 Jan 2017 : Govind Padvi
चालू घडामोडी - 19 जानेवारी
महाराष्ट्र
ठाण्याची ओशिका होणार ट्रम्प यांच्या शपतविधीची साक्षीदार
# अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची संधी ठाणे येथील एका विद्यार्थिनीला मिळाली आहे. पुण्याच्या सिंबॉयसिस महाविद्यालयात बीएच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या ओशिका निओगी हिला ही संधी मिळणार असून यूएस प्रेसिडेन्शियल लीडरशिप समिटमध्ये ती सहभागी होणार आहे. जागतिक पातळीवरील युवक संमेलनातही ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
राष्ट्रिय
'पद्म'च्या संभाव्य यादीत यांचा समावेश
अवघ्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन आला असताना ‘पद्म’ पुरस्कारांच्या संभाव्य मानकरींच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. या यादीत ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे ग्लोबल हेड सत्या नडेला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नावे आघाडीवर आहेत.
क्रीडा
मराठमोळ्या केदारने रचला नवा विक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये टीम इंडियाने तीन गडी राखत विजय मिळवला. या सामन्यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि पुणेकर केदार जाधव यांनी धमाकेदार खेळी करत इंग्लडने उभा केलेला धावांचा डोंगर सर केला. या सामन्यामध्ये मराठमोळ्या केदार जाधवला सामनावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तंत्रज्ञान
मंगळावरील वातावरणात सूक्ष्म जीव टिकू शकतात
मंगळावरील विरळ हवेत सूक्ष्म जीव जिवंत राहू शकतात, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. पृथ्वीवरील मिथेन निर्मिती करणारे जिवाणू मंगळावर टिकाव धरू शकतील असा त्यांचा अंदाज आहे. भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाचा या संशोधनात समावेश आहे. मंगळाचा पृष्ठभाग सध्या कोरडा व थंड आहे, पण तेथे नद्या, सरोवर व सागर अब्जावधी वर्षांपूर्वी होते याचे पुरावे आहेत. पृथ्वीवर जेथे द्रव आहे तेथे सूक्ष्म जीव आहेत. मंगळावरील ओलसरपणा होता त्यामुळे तेथे अजूनही सूक्ष्म जीव असावेत. अमेरिकेतील अरकान्सास विद्यापीठाच्या रिबेका मिकॉल यांनी सांगितले की, पृथ्वीवर जसे सूक्ष्म जीव आहेत तसे तिथेही असू शकतात. अगदी आपल्यासारखेच सूक्ष्म जीव तिथे असतील असे नाही, तर त्यात फरक असू शकतो.

No comments:
Post a Comment