Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views
    चालू घडामोडी - 18 जानेवारी
    Wed, 18 Jan 2017 :Govind Padvi

    चालू घडामोडी - 18 जानेवारी
       महाराष्ट्र

    जळगावच्या निशा पाटीलचा होणार शौर्य पुरस्काराने सन्मान


    # आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका चिमुरडीला वाचवल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भडगावच्या निशा पाटील या विद्यार्थिनीला राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. भडगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची निशा पाटील ही विद्यार्थिनी असून तिची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
     अर्थसत्ता

    ‘फिनो’कडून ‘पेमेंट बँके’साठी  ४०० कोटी गुंतवणुकीची पूर्तता
    # नियमानुसार आवश्यक ४०० कोटी गुंतवणुकीची पूर्तता करून लवकरच पेमेंट बँकेचे कामकाज सुरू करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे अंतिम मंजुरीसाठी अर्ज करण्याचे फिनो पेटेकने जाहीर केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने आखून दिल्याप्रमाणे बहुतांश भांडवल देशातूनच उभे करण्याच्या अटीचे पालन फिनोकडून करण्यात आले आहे.

    # जुलै २०१६ मध्ये भारत पेट्रोलियम कंपनीने फिनो पेटेकच्या भांडवलात २५१ कोटी रुपयांची गुंतवणूक करून २१ टक्के भागीदारी घेतली होती व नुकतीच आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स व आयसीआयसीआय लॉम्बार्ड व इतर दोन कंपन्यांनी १४९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
      आंतरराष्ट्रीय

    चंद्रावर चालणारा शेवटचा अंतराळवीर काळाच्या पडद्याआड

    # चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारे शेवटचे अंतराळवीर यूजिन सरनेन यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. अमेरिकेच्या नासाने ही माहिती दिली आहे. सरनेन हे 1972 साली चंद्रावर पोचलेल्या अपोलो 17 या अंतराळयानाचे कमांडर होते. त्यांनी तीनदा अंतराळाची सफर केली होती आणि चंद्रावर पोचणारे ते शेवटचे व्यक्ती होते. सरनन यांनी नेलेल्या मोहिमेदरम्यान चंद्रावरून पृथ्वीची सर्वोत्कृष्ट छायाचित्रे घेण्यात आली होती. याला ब्ल्यू मार्बल म्हणून ओळखले गेले.

    अफ्रिकी अमेरिकी महिलेच्या रुपात लेडी लिबर्टी

    # अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच लेडी लिबर्टी (स्वातंत्र्यदेवता) अफ्रिकी अमेरिकी महिलेच्या रूपात नाण्यावर अवतरली असून १०० डॉलर्स किंमतीचे हे चोवीस कॅरेट सोन्याचे नाणे अमेरिकी टांकसाळीत तयार करण्यात आले आहे. या नाण्याचे अनावरण अमेरिकी टांकसाळ प्रमुख एलिझा बेसनाईट यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ही नाणी एप्रिलमध्ये रिलीज होणार आहेत. टांकसाळीच्या २२५ व्या वर्धापन दिनामिमित्त हे सुवर्णनाणे तयार केले गेले आहे. आजपर्यंतच्या नाणे इतिहासात १०० डॉलर्स मूल्याच्या नाण्यावर नेहमीच स्वातंत्र्यदेवता गौरवर्षी महिलेच्या रूपात अवतरली होती.

    No comments:

    Post a Comment