चालू घडामोडी - १७ फेब्रुवारी
Wed, 15 Feb 2017 : Govind Padvi
महाराष्ट्र
एसटी बसेसमध्ये आजपासून वाय-फाय
# सुरक्षित, आरामदायी प्रवासाबरोबर मनोरंजनात्मक प्रवासाची अनुभूती आता एस.टी.च्या प्रवाशांना घेता येणार आहे. राज्यातील दोन हजार बसेसमध्ये वाय-फाय सेवा सुरू झाली आहे. पुढील टप्पा म्हणून मुंबई, पुणे, ठाणे पाठोपाठ आता कोल्हापुरातील 127 बसेसमध्ये ही सेवा मिळणार आहे.
राष्ट्रीय
कराची शहर ठरतोय भारतविरोधी दहशतवाद्यांचा अड्डा
देश-विदेश
29 अमेरिकी खासदार भारत दौऱ्यावर अवकाशात # फेब्रुवारी महिन्यात विक्रमी 29 अमेरिकी खासदार भारत दौरा करणार आहेत. यामध्ये रिपब्लिकन आणि डेमॉक्रेटिक या दोन्ही पक्षांचे खासदार आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर होणारा हा पहिला दौरा भारत-अमेरिका संबंध आणखीन मजूबत करण्यासाठी खूप सकारात्मक मानला जात आहे.
आंतरराष्ट्रीय
पाकच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिवपदी तहमीना जंजुआ # भारतातील पाकिस्तान उच्चायुक्त अब्दुल बासित यांना मागे टाकत तहमीना जंजुआ या पाकिस्तानच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव बनल्या आहेत. पराष्ट्र सचिव पदाच्या शर्यतीत बासित यांच्यासह चीनमधील पाकिस्तानचे राजदूत मसूद खालिद हेही होती. तहमीना या पुढील मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात परराष्ट्र सचिव पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
अर्थसत्ता
स्मार्टफोन विक्रीत अॅपल अव्वल
# जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत सॅमसंगला मागे टाकत अॅपलने अव्वल स्थान काबीज केले असून अॅपलने सॅमसंगला दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच मागे टाकले आहे. ७ कोटी ७० लाख ४ हजार स्मार्टफोनची अॅपलने चौथ्या तिमाहीमध्ये विक्री केली आहे. तर गेल्या तिमाहीत सॅमसंगने ७ कोटी ६७ लाख ८ हजार स्मार्टफोनची विक्री केली आहे. याबद्दलची आकडेवारी गार्टनर या संशोधन संस्थेने प्रसिद्ध केली आहे.





No comments:
Post a Comment