Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Assistant Motor Vehicle Inspector(सहायक मोटार वाहन निरीक्षक)

    Views
    ARTO AMVI book list

    Assistant Motor Vehicle Inspector

    सहायक मोटार वाहन निरीक्षक



    सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची ऍड आलेल्या दिवसापासून आम्हाला आमच्या फेसबुक पेज वर , टेलिग्राम वर , व्हाट्स ऍप वर , तसेच ब्लॉग वरही AMVI एक्साम साठी बुक लिस्ट देण्याची मागणी होत होती. प्रथमतः क्षमा असावी बुक लिस्ट द्यायला थोडा उशीर झाला , पण गडबडीत काहीतरी पुस्तकांची नावे देणेही

    योग्य ठरले नसते म्हणून थोडा उशीर झाला.



    पहिली गोष्ट तर अशी की यापूर्वीची एक्साम खूप दिवसांपूर्वी झालेली असल्याने याच्या जुन्या प्रश्नपत्रिका खूप कमी उपलब्ध आहेत , आणि ज्या आहेत त्या सध्याच्या अभ्यासक्रमाच्या जवळ जाणाऱ्या आहेत पण सध्याच्या पॅटर्न नुसार नाहीत त्यामुळे एक एक बुक शोधत असताना खूप काळजी घ्यावी लागली. एक्साम ला राहिलेला कमी काळ पाहता काही चुकीचं जाऊ नये याची काळजी घेतलेली आहे. बुक लिस्ट तयार करताना स्पर्धा परिक्षातील जुने विद्यार्थी , तज्ञ यांच्याशी विचार विनिमय करून काढलेली आहे , तरीही हि बुक लिस्ट काही परिपूर्ण असं सांगू शकत नाहीय. कारण MPSC बद्दल कोणीही हमी देऊ शकत नाही. पण तुमच्या अभ्यासाला नक्कीच दिशा देण्याचे काम करू शकते याबाबत दुमत नाही.



    अभ्यासक्रम आणि पोस्ट पाहता काही विषयांवर खूपच बेसिक प्रश्न तर काही विषयांवर जास्त काठिण्यपातळीचे प्रश्न येण्याची शक्यता आहे , त्यामुळे त्यानुसार आम्ही बुक सुचवली आहेत. उदा. बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर थोड्या जास्त काठिण्य पातळीचे प्रश्न येण्याचा अंदाज आहे त्यामुळे आम्ही बुद्धिमत्ता मधील बेस्ट पुस्तके सुचवली आहेत. ती इंग्रजी मधून आहेत याचा तुम्हाला फायदाच होईल.



    श्यक्यतो बुक लिस्ट देताना आम्ही इंग्रजी माध्यमातील पुस्तके सुचवली आहेत, पण काही विषयांचे विषयज्ञान हे मराठीत जास्त चांगले आहे त्यामुळे मराठी मधूनही काही पुस्तके सुचवली आहेत.



    सर्वात महत्वाचं म्हणजे या एक्साम चा प्लॅनर. सध्या बाजारात स्टडी सर्कल चा एक खूप छान प्लॅनर आला आहे AMVI प्लॅनर नावाने याचा तुम्हाला खूप फायदा होईल . प्रत्येक विषयाचा नेमका कोणता पॉईंट वाचायचा ते नेमकं सांगितलेलं आहे. तो नक्की विकत घेऊन रेफर करा शिवाय त्यामध्ये अभ्यासक्रम व मागील प्रश्नपत्रिकाही दिलेल्या आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे हा प्लॅनर online खरेदी करू शकता पुढील लिंक वरून : AMVI प्लॅनर Buy Online



    टीप : खालील बुक लिस्ट मधील काही बुक्स टेलिग्राम चॅनेल वर असतील तर त्यांच्या लिंक्स ( टेलिग्राम लिंक )पुढे देतोय , शिवाय काही बुक्स online विक्रीसाठी आहेत त्यांच्याही लिंक्स ( buy Online ) अशा देत आहोत , ज्यांना हवे आहेत ते  online बुक मागवू शकतात.



    चालू घडामोडी -

    चालू घडामोडींमध्ये महाराष्ट्र , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय , पर्यावरण विज्ञान व तंत्रज्ञान या विषयक प्रश्न येत असतात. आता हा भाग तसा दररोजच्या वर्तमानपत्रातून अभ्यास करावा असा आहे , पण आपल्यापैकी बरेच जण अभ्यासाच्या टच मध्ये किती आहेत हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. चालू घडामोडींवर प्रश्न हे साधारणतः परीक्षा दिनांकाच्या मागील 1 वर्षीच्या विचारतात , मात्र प्रश्नांचा भर मात्र शेवच्या सहा महिन्यावर जास्त असतो. तेंव्हा यासाठी सकाळ इयर बुक उपयोगी ठरेल . तसेच जानेवारी 2017 ते एप्रिल 2017 मधील चालू घडामोडी साठी त्या काळातील मासिके घ्या फायदेशीर ठरतील .  तसेच आपल्या ब्लॉग वर प्रत्येक महिन्याच्या अपडेट स्वरूपात चालू घडामोडी आहेत त्याही वाचा शेवटी rivision साठी फायदा होईल.

    Books :

    सकाळ इअर बुक 2017 Buy Online

    मासिके- स्पर्धा परीक्षा , पृथ्वीची परिक्रमा ( जानेवारी एप्रिल 2017 चे अंक )



    सामाजिक व औद्योगिक सुधारणा-

    देसाई भालेराव - ( मराठी मधून ) फक्त औद्योगिक व पायाभूत क्षेत्राशी संबंधित टॉपिक वाचा

    दत्त आणि सुंदरम - ( इंग्लिश मधून ) फक्त औद्योगिक शी संबंधित टॉपिक वाचा.



    Books :

    देसाई- भालेराव Buy Online

    किंवा

    दत्त आणि सुंदरम Buy Online





    सामान्य विज्ञान-

    या विषयाच्या तयारीसाठी तुम्ही 5 वी ते 10 वी ची सामान्य विज्ञान विषयांची पुस्तके वाचू शकता आणि सोबत लुसेन्ट पब्लिकेशन चे बुक इंग्लिश मधून उपलब्ध आहे तेही वाचा. बेसिक पुस्तकातील टॉपिक वाचून लगेच लुसेन्ट मधील टॉपिक वाचला तर फायदेशीर ठरेल.



    Books:

    5 वी , 6वी , 7वी , 8वी Download in Pdf

    9वी व 10वी विज्ञान

    लुसेन्ट ( इंग्लिश मधून ) Buy Online


    भारताचा सामान्य इतिहास ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह )- 

    हा तसा खूप मोठा आवाका असणारा विषय आहे पण येणारे प्रश्न हे तुलनेने आयोगाच्या इतर परिक्षांपेक्षा सोपे असू शकतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .



    Books:

    5 वी , 8वी , इतिहास Download in Pdf

    11 वी इतिहास शालेय पुस्तके

    महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे Buy Online

    किंवा

    महाराष्ट्राचा इतिहास - गाठाळ



    भारताचा सामान्य भूगोल ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह )-

    भूगोल या विषयावर राज्यसेवा किंवा PSI/STI/ASO या एक्साम मध्ये आयोगाने अजून पर्यंत तरी बेसिक पुस्तकांवर जास्त भर दिलेला आहे त्यामुळे आपणही बेसिक वरच भर जास्त द्यावा सोबत सवदी मधील ठराविक टॉपिक वाचावेत.



    Books:

    4थी , 5 वी , भूगोल Download in Pdf

    9वी ,10वी भूगोल

    भारताचा भूगोल-  सवदी मधील भारताशी व महाराष्ट्राशी संबंधित टॉपिक Buy Online

    ऍटलास-

    सवदी Buy Online

    नवनीत

    ऑक्सफर्ड Buy Online



    नागरिकशास्त्र - 

    या विषयाची तयारी करताना आपण बेसिक पुस्तके आणि सोबत लक्ष्मीकांत वाचले तर फादेशिर ठरेल



    Books:

    5वी 6वी 7वी 8वी Download in Pdf

    9वी ,10 वी व 12 वी

    एम. लक्ष्मीकांत Buy Online 



    बुद्धिमापन चाचणी-

     या विषयाच्या प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे याची चांगल्या पुस्तकातून करा. ( कोणत्याही प्रकाशनाचे मराठी मधील पुस्तक रेफर करू नका .) यासाठी दर्जेदार अशी पुस्तके इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत त्यांचा वापर करा.

    Modern Approach to verbal and non verbal reasoning - R S Agrawal Buy Online 



    Logical Reasoning - Lucent Buy Online 



    Letest trends and technological development in the field of mechanical and automobile engineering.-

    हा विषय असा आहे की याची तयारी करण्याविषयी तुम्हाला जास्त सांगणे न लगे, कारण हा विषय तुमच्या पदवीशी संबंधित आहे त्यामुळे यासाठी काय वाचायला हवं ते तुम्ही जाणताच. स्टडी सर्कल प्लॅनर मध्ये पॉईंट्स दिलेले आहेत त्याप्रमाणे स्टडी करा.


    वेळोवेळी अपडेट माहिती आम्ही टेलिग्राम चॅनेल वर पाठवत राहू.


    सर्वाना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी शुभेच्छा.

    Best Luck 👍👍

    -------------------------------------------------
    -------------------------------------------------