Current affairs | Evening News Marathi
Current affairs 2 December 2019 Marathi |
2 डिसेंबर 2019 मराठी करेंट अफेयर्स
थायलँडची जागतिक वारसा समितीच्या सभासदपदी निवड झाली
नुकतीच, थायलँडची UNESCOच्या जागतिक वारसा समितीच्या (World Heritage Committee) सभासदपदी निवड करण्यात आली आहे.27 नोव्हेंबर 2019 रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे भरविण्यात आलेल्या जागतिक वारसा परिषदेच्या सदस्यांच्या महासभेच्या 22 व्या सत्रात 193 देशांनी 21 सभासदांच्या जागतिक वारसा समितीमधील रिक्त असलेल्या 9 जागा भरण्यासाठी मतदान केले.
या निवडणुकीमधून समितीच्या आशिया-प्रशांत क्षेत्रासाठी उपलब्ध जागेवर थायलँडची निवड झाली. याच्या व्यतिरिक्त अन्य रिक्त जागी सौदी अरब, इजिप्त, इथिओपिया, माली, नायजेरिया, ओमान, रशिया आणि दक्षिण आफ्रिका यांची निवड केली गेली.
वर्तमानात समितीवर सभासदपदी असलेले देश - ऑस्ट्रेलिया, बहरीन, बोस्निया व हर्झगोव्हिना, ब्राझील, चीन, ग्वाटेमाला, हंगेरी, किर्गिझस्तान, नॉर्वे, सेंट किट्स व नेव्हिस, स्पेन आणि युगांडा.
भारतातली जागतिक वारसा स्थळे
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.
आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.
सांस्कृतिक
- आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश
- अजिंठा लेणी, महाराष्ट्र
- नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार
- बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)
- चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
- छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
- गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट
- एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
- एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र
- फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश
- चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू
- हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
- महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू
- पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
- राजस्थानामधील पर्वतीय किल्ले
- अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर
- हुमायूनची कबर, दिल्ली
- खजुराहो, मध्यप्रदेश
- महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
- भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
- कुतुब मिनार, दिल्ली
- राणी की वाव, पटना, गुजरात
- लाल किल्ला, दिल्ली
- दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश
- कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा
- ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश
- ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड
- जंतर मंतर, जयपूर
- मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत
- जयपूर
- ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश
- काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
- मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
- केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
- सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
- नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
- पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)
- खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन: 2 डिसेंबर
दिनांक 2 डिसेंबर 1984 या दिवशी रात्री भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले तर लाखो लोक त्याने प्रभावित झाले. या दुर्घटनेच्या स्मृतीत देशात 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन पाळला जातो.औद्योगिक क्षेत्राला या घटनेची आठवण राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी जागृती पसरवण्यासाठी हा दिवस भारतात पाळला जातो.
औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवर होणार्या प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर जीवसृष्टी, नैसर्गिक स्त्रोत आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी प्रत्येक स्तरावर विविध उपक्रमे राबवली जातात.
पार्श्वभूमी
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनी (ILO) त्याच्या “द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क - बिल्डिंग ऑन 100 इयर्स ऑफ एक्स्पीरियन्स” या अहवालात हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या 1984 सालाच्या ‘भोपाळ वायुगळती’ घटनेला शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून नोंदवण्यात आले आहे.
मध्यप्रदेशाच्या राजधानीत ‘युनियन कार्बाइड’ या किटकनाशके बनविण्याच्या प्रकल्पात मिथाइल आयसोसायनेट (मिक) वायूची गळती होऊन किमान 6 लाखांहून अधिक मजूर व परिसरातल्या रहिवाशांना फटका बसला होता. त्यात सरकारी आकड्यानुसार 15 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. विषारी कण अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे हजारो पिडीत व त्यांची पुढची पिढी श्वसनासंबंधी आजाराचा सामना करत आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment