Current affairs | Evening News Marathi
Current affairs 23 March 2019 Marathi |
23 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
देशातल्या 91 धरणांच्या जलपातळीत दोन टक्क्यांची घट
22 मार्चला भारताने जागतिक जल दिन पाळला. आजा आपण भारतातली पाण्याची वर्तमान स्थिती बघूया.भारतातले पाणी
- देशातल्या महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 20 मार्च 2019 रोजी संपलेल्या आठवड्यात 54.002 अब्ज घनमीटर (BCM) पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 33% इतके आहे. 14 मार्च 2019 रोजी संपलेल्या आठवड्यासाठी ही टक्केवारी 35% होती.
- या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 161.993 अब्ज घनमीटर इतकी आहे.
- 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
उत्तर विभाग – या विभागात हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान यांचा समावेश आहे. केंद्रीय जल आयोगाच्या (CWC) देखरेखीखाली सहा जलाशये असून त्यांची एकूण जल साठवण क्षमता 18.01 BCM आहे.
पूर्व विभाग – या विभागात झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. CWCच्या देखरेखीखाली 15 जलसाठे असून त्यांची एकूण क्षमता 18.83 BCM आहे.
पश्चिम विभाग - या विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून, यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 31.26 BCM आहे. या साठ्यांमध्ये सध्या 7.08 BCM पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 23% पाणीसाठा उपलब्ध आहे.
मध्य विभाग - या विभागात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. CWCच्या देखरेखीखाली 12 जलसाठे असून त्यांची एकूण क्षमता 42.30 BCM आहे.
दक्षिण विभाग - या विभागात आंध्रप्रदेश, तेलंगणा, AP&TG (दोन्ही राज्यांचा दोन संयुक्त प्रकल्प), कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. CWCच्या देखरेखीखाली 31 जलसाठे असून त्यांची एकूण क्षमता 51.59 BCM आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 23 March 2019 Marathi |
23 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
2035 सालापर्यंत क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये 57% घट होण्याचा अंदाज आहे: लँसेट
भारतासह तीन उच्च-भार असलेल्या देशांसाठी तयार केलेल्या मॉडेलवर आधारित ‘लँसेट ग्लोबल हेल्थ’ अहवालानुसार, 2015 सालाच्या माहितीशी तुलना करता, 2035 सालापर्यंत क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये 57% आणि मृत्युदरात 72% घट होण्याचा अंदाज आहे.जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2017 साली जागतिक पातळीवर 10 दशलक्ष नवे क्षयरोगी दिसून आलेत, ज्यातले 2.74 दशलक्ष लोक भारतातले आहेत.
क्षयरोग काय आहे?
क्षयरोग हा ‘मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलॉसिस’ नावाच्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. तो मुख्यत्वे करुन फुफुसाचा आजार आहे. शरीराच्या इतर अवयावांनाही (उदा. मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था, त्वचा, हाडे इ.) तो होवू शकतो. क्षयरोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. क्षयरोग हा अनुवंशिक आजार नाही.
दाटीवाटीने राहणे, वातावरणातील प्रदुषण, कुपोषण, औदयोगिकरण या कारणांनी हा आजार बळावतो. क्षयरोगाचा रुग्ण जेंव्हा खोकतो, शिंकतो त्यावेळी क्षयरोगाचे जंतू वातावरणात पसरतात. श्वासावाटे जंतू शरीरात प्रवेश केल्यानंतर ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे, अश्यांमध्ये क्षयरोगची लक्षणे दिसतात.
रॉबर्ट कॉक ह्यांनी क्षयरोगास कारणीभूत असणारा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसिस हा जीवाणू रुग्णालयात काम करत असताना शोधला.
उपचार पद्धती - क्षयरोगाचा उपचार सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत मुलांना व प्रौढ व्यक्तींना रुग्णनिहाय औषधी पॅकमध्ये उपलब्ध आहे. क्षयरोगाचा उपचार हा वेग- वेगळया कॅटेगॅरीत उपलब्ध आहेत. क्षयरोगाचा उपचार हा या कार्यक्रच्या अंतर्गत आरोग्य कार्यकर्त्याच्या समक्ष देखरेखेखाली दिला जातो. त्याला डॉट (DOT) उपचार पध्दती म्हणतात.
क्षयरोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती
- पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.
- क्षयरोग तपासण्या करून घेणे.
- क्षयरोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे.
- तोंड झाकणे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 23 March 2019 Marathi |
23 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
‘LIMA प्रदर्शनी 2019’ यात भारतीय हवाई दल सहभागी होणार
26 ते 30 मार्च या काळात मलेशियात ‘लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी व हवाई प्रदर्शनी (LIMA 2019)’ भरविण्यात येणार आहे.भारतीय हवाई दल प्रथमच या सागरी हवाई प्रदर्शनीत सहभागी होणार असून, स्वदेशी विकसित ‘तेजस’ ही वजनानी हलकी लढाऊ विमाने (LCA) येथे प्रदर्शित केले जाणार आहे.
या प्रदर्शनीत सहभागी झाल्यामुळे भारतीय हवाई दलाला रॉयल मलेशियन एयर फोर्स समवेत संवाद साधण्यासाठी आणि दोन्ही देशातल्या हवाई दलात अधिक घनिष्ट संबंध निर्माण करण्यासाठी संधी मिळणार आहे.
LIMA बद्दल
‘लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी व हवाई प्रदर्शनी (LIMA)’ ही एक सागरी व हवाई प्रदर्शनी आहे, जी मलेशियाच्या लांगकावी शहरात दर दोन वर्षांनी एकदा भरविण्यात येते. 1991 साली पहिल्यांदा ही प्रदर्शनी भरविण्यात आली. हा कार्यक्रम आशिया-प्रशांत क्षेत्रात भरविण्यात येणार्या सर्वात मोठ्या सागरी आणि हवाई प्रदर्शनींपैकी एक आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 23 March 2019 Marathi |
23 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
मोझांबिकमध्ये मानवतावादी सहाय्यासाठी भारतीय नौदलाची जहाजे तैनात
मोझांबिक या आफ्रिकी देशाच्या किनाऱ्याला दिनांक 15 मार्च 2019 रोजी ‘इदाई (Idai)’ चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर स्थानिकांना मानवतावादी सहाय्य पुरविण्यासाठी भारतीय नौदलाची जहाजे पोहचली.भारतीय नौदलाच्या पहिल्या ट्रेनिंग स्क्वाड्रनमधली ‘INS सुजाता’, ‘INS सारथी’ आणि ‘INS शार्दुल’ ही तीन जहाजे बैरा बंदराकडे वळवण्यात आली. ही जहाजे दक्षिण हिंद महासागरात तैनात होती.
18 आणि 19 मार्चला बैरा बंदरात दाखल झाल्यानंतर या जहाजांनी स्थानिक प्रशासनासोबत तात्काळ कार्य सुरू केले. 15 मार्चला चक्रीवादळाचा तडाखा बैरा बंदराला बसला. या वादळामुळे मोठी जिवित आणि वित्तहानी झाली. नागरिकांना अन्न, औषधे आणि कपडे, पिण्यायोग्य पाणी पोहचवले जात आहे.
‘इदाई’ चक्रीवादळ
‘इदाई’ चक्रीवादळाला आफ्रिका आणि दक्षिण गोलार्धाला संपूर्णपणे प्रभावित करणारे सर्वाधिक वाईट उष्णकटिबंधीय वादळांपैकी एक मानले जाते.
2018-19 या वर्षाच्या नैऋत्य हिंद महासागरातल्या चक्रीवादळ हंगामाचे हे दहावे चक्रीवादळ आणि विक्रमी आठवे तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ 4 मार्चला मोझांबिकच्या पूर्वेकडील सागरी प्रदेशात तयार झाले.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 23 March 2019 Marathi |
23 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
आफ्रिका-इंडिया फील्ड ट्रेनिंग एक्सरसाईज 2019 (AFINDEX-19)
दिनांक 18 मार्च 2019 रोजी पुणे (महाराष्ट्र, भारत) येथे ‘आफ्रिका-इंडिया फील्ड ट्रेनिंग एक्सरसाईज 2019’ (AFINDEX-19) या सरावाला सुरुवात झाली. हा या मालिकेचा पहिला सराव आहे.याअंतर्गत मानव आणि यंत्राद्वारे सुरुंग निकामी करणे, IED निकामी करणे याच्याशी संबंधित प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सरावात सहभागी झालेले देश - बोटस्वाना, इजिप्त, घाना, केनिया, मोझांबिक, नामिबिया, नायजेरिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, सुदान, टांझानिया, युगांडा, झांबिया आणि झिंम्बाब्वे, (तीन निरीक्षक) रवांडा, काँगो आणि मादागास्कर
आफ्रिका खंड
आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. हा खंड पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण 56 सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.
आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई बेटे आहेत. आग्नेयेला हिंद महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला हा खंड आहे. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध प्रदेशांना सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 23 March 2019 Marathi |
23 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
CBIC कडून परकीय चलनाचे नवे विनिमय दर अधिसूचित
‘सीमा शुल्क अधिनियम-1962’ याच्या कलम क्र. 14 अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करीत केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (CBIC) अनुसूची-I आणि अनुसूची-II यामध्ये स्पष्ट केलेल्या प्रत्येक परकीय चलनाचे (ज्यांचा उल्लेख स्तंभ (2) मध्ये केला गेला आहे) नवे विनिमय दर ठरविले आहेत.नवे विनिमय दर आयात आणि निर्यात केल्या जाणार्या वस्तूंच्या संदर्भात स्तंभ (3) मध्ये केल्या गेलेल्या संबंधित नोंदणीनुसार दि. 21 मार्च 2019 पासून लागू केले जातील.
हे दर पुढीलप्रमाणे आहेत;
अनुसूची - I
परकीय चलन | विनिमय दर (परकीय चलनाच्या एका एककाचे भारतीय रुपयामधील समतुल्य दर) | |
(आयात केल्या जाणार्या वस्तूंसाठी) | (निर्यात केल्या जाणार्या वस्तूंसाठी) | |
ऑस्ट्रेलियाई डॉलर | 50.05 | 47.85 |
बहरीनी दीनार | 189.50 | 177.70 |
कॅनेडियाई डॉलर | 52.85 | 50.90 |
चीनी युआन | 10.45 | 10.15 |
डेनिश क्रोनर | 10.70 | 10.30 |
यूरो | 80.00 | 77.05 |
हाँगकाँग डॉलर | 9.00 | 8.65 |
कुवैती दीनार | 235.65 | 220.50 |
न्यूझीलँड डॉलर | 48.50 | 46.30 |
नॉर्वेजियाई क्रोनर | 8.25 | 7.95 |
पाउंड स्टर्लिंग | 93.30 | 90.00 |
कतारी रियाल | 19.65 | 18.40 |
सौदी अरबी रियाल | 19.05 | 17.85 |
सिंगापूर डॉलर | 52.05 | 50.25 |
दक्षिण आफ्रिकी रॅंड | 4.95 | 4.60 |
स्वीडीश क्रोनर | 7.65 | 7.35 |
स्विस फ्रँक | 70.55 | 67.80 |
तुर्की लीरा | 13.00 | 12.25 |
यूएई दिरहम | 19.45 | 18.25 |
अमेरिकी डॉलर | 70.00 | 68.35 |
परकीय चलन | विनिमय दर (परकीय चलनाच्या 100 एककाचे भारतीय रुपयामधील समतुल्य दर) | |
(आयात केल्या जाणार्या वस्तूंसाठी) | (निर्यात केल्या जाणार्या वस्तूंसाठी) | |
जपानी येन | 63.15 | 60.80 |
कोरियाई वॉन | 6.30 | 5.95 |
1855 साली भारतातल्या तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरलने भारतामध्ये सीमाशुल्क कायदा व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि आयात शुल्क / भूमी महसूल जमा करण्यासाठी ‘कस्टम्स अँड सेंट्रल एक्साईज / CGST डिपार्टमेंट’ स्थापन केले. त्यानंतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) याची स्थापना 26 जानेवारी 1944 रोजी ‘अबकारी कर आणि सीमा शुल्क मंडळ’ (CBEC) या नावाने करण्यात आली. ही संस्था भारतात सीमा शुल्क, GST, केंद्रीय उत्पादन कर, सेवा कर आणि अंमली पदार्थाचे प्रशासन राखण्यासाठी जबाबदार असलेली केंद्रीय राष्ट्रीय संस्था आहे.
No comments:
Post a Comment