Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, March 14, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 14 March 2019 Marathi | 14 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 March 2019 Marathi |   
    14 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी




    “फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धत” म्हणजे काय?

    निवडणुकीत वापरल्या जाणार्‍या ‘फर्स्ट पास्ट द पोस्ट’ पद्धतीमध्ये काळानुसार बदल करण्याची गरज भासत आहे, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी मांडले.
    चला तर आज आपण या संज्ञेविषयी जाणून घेऊ.
    ज्या उमेदवाराला मतमोजणीत सर्वाधिक मते मिळतात त्याला निवड झाल्याचे घोषित करण्याची पद्धत (फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धत) भारतात पूर्वापार आहे.
    या पद्धतीत काही त्रुटी आहेत. विशिष्ट मतदारसंघातील अधिकृतपणे मतदानास पात्र असलेल्या मतांच्या 1 टक्का इतके कमी मतदान झाले तरी झालेल्या जेमतेम काही हजार मतांच्या आधारावर तो निवडून येऊ शकतो.
    भारतात मतदानाची सरासरी टक्केवारी 55 ते 60 टक्के इतकी असते. ही 60 टक्के मते अनेक उमेदवारांमध्ये विभागली जातात आणि बहुसंख्य मतदारसंघातल्या लढती तिरंगी किंवा त्याहून अधिक असतात. या परिस्थितीत राजकारणी मंडळी विविध युत्या नि आघाड्या करू शकतात आणि या जोडतोडीत असंख्य समाजघटक मोठ्या प्रमाणात बाहेर सारले जातात.
    स्त्रोत: विकिपेडिया

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 March 2019 Marathi |   
    14 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    कर्नाटकाच्या ‘सिर्सी सुपारी’ला GI टॅग प्राप्त झाले

    कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड प्रदेशात उत्पन्न घेतल्या जाणार्‍या ‘सिर्सी सुपारी’ला भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले. येलपूरा, सिद्दापूरा आणि सिर्सी तालुक्यात देखील सुपारीचे पीक घेतले जाते.
    भौगोलिक खूण (GI)
    भौगोलिक खूण (Geographical Indication) हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलिक ओळख मिळते आणि त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते. उदा. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. भारताच्या बौद्धिक संपदा अधिकार जाहिरात व व्यवस्थापन विभाग (Cell for IPR Promotion and Management -CIPAM) कडून भारतीय उत्पादनांना GI टॅग प्रदान केला जातो.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 March 2019 Marathi |   
    14 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    ‘ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2019’ स्पर्धेचे प्रायोजकत्व ‘गोडॅडी’ कंपनीला मिळाले

    मे महिन्यात खेळल्या जाणार्‍या बाराव्या ‘ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2019’ या स्पर्धेचे प्रायोजकत्व ‘गोडॅडी इंक’ या कंपनीला देण्यात आले आहे. त्यासंबंधीचा भागीदारी करार कंपनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सोबत नुकताच केला.
    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)
    हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक मंडळ आहे. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती आणि सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले. ICC चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या दुबई शहरात आहे. ICCचे 105 सदस्य संघ आहेत आणि त्यात 12 पूर्ण सदस्य आहेत, जे कसोटी सामने खेळतात.
    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. 1975 साली सर्वप्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 March 2019 Marathi |   
    14 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    सर्वाधिक सोनेसाठा असलेल्या देशांमध्ये भारताचा 11 वा क्रमांक: WGC अहवाल

    जागतिक सुवर्ण परिषद (WGC) याच्या ताज्या अहवालानुसार, भारताकडे वर्तमानात 607 टन सोन्याचे भंडार असून सर्वाधिक सोनेसाठा असलेल्या देशांमध्ये भारताचा 11 वा क्रमांक लागतो आहे.
    अहवालाच्या ठळक बाबी
    • अमेरिकेकडे 8133.5 टन सोनेसाठा असून यादीत तो प्रथम स्थानी आहे.
    • अमेरिकेच्या पाठोपाठ जर्मनी (3369.7 टन), आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (2814 टन), इटली आणि फ्रान्स (2400 टन) यांचा क्रम लागतो. चीनकडे 1864.3 टन तर जपानकडे 765.2 टन सोने आहे.
    • तैवान, पोर्तुगाल, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, सौदी अरब, ब्रिटन, लेबनॉन आणि स्पेनसारख्या देशांचा पहिल्या 20 देशांमध्ये समावेश आहे.
    • 48 टन सोन्याच्या खरेदीनंतर आणि 13 टन विक्रीनंतर जागतिक सोन्याचे भंडार जानेवारीत 35 टनांनी वाढले. यात 9 केंद्रीय बँकांच्या वृद्धीचा समावेश आहे. 2002 सालापासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे.
    जागतिक सुवर्ण परिषद (WGC)
    ही सुवर्ण उद्योग बाजारपेठेसाठीची एक विकास संस्था आहे. ही सोन्याचे खनिकर्म यापासून ते गुंतवणूक अश्या उद्योगाच्या सर्व भागात कार्य करते. ते भारत आणि चीनमध्ये देखील SPDR GLD आणि सुवर्ण ठेव योजना अश्या विविध उत्पादनांना चालवते. त्याचे मुख्यालय ब्रिटनमध्ये (UK) आहे तसेच भारत, चीन, सिंगापूर, जपान आणि अमेरिका येथे विभागीय कार्यालये आहेत.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 March 2019 Marathi |   
    14 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    अॅस्ट्रोसॅटने ‘ग्लोब्युलर क्लस्टर NGC 2808’ मधील अतिनील तार्‍यांचा पुंजका शोधला

    भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’ या अंतराळ वेधशाळेपासून मिळविलेल्या माहितीच्या आधारे भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 47,000 प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ‘ग्लोब्युलर क्लस्टर NGC 2808’ मधील अतिनील तार्‍यांचा (ultraviolet stars) पुंजका शोधून काढला आहे.
    ‘ग्लोब्युलर क्लस्टर’ म्हणजे हजारो-लाखो तारे एकाग्र असल्याचे भासवत एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणाद्वारे एकत्रितपणे स्वैराचार करतात.
    अॅस्ट्रोसॅट बाबत
    अॅस्ट्रोसॅट (ASTROSAT) ही 1513 किलो वजनी भारताची पहिली समर्पित बहू-तरंगी अंतराळ वेधशाळा आहे. ही मोहीम दिनांक 28 सप्टेंबर 2015 रोजी पाठवण्यात आली. हे समुद्रसपाटीपासून 650 कि.मी. उंचीवर पृथ्वीच्या खालच्या विषुववृत्तीय कक्षेत प्रस्थापित करण्यात आले आहे. हे एकाचवेळी विविध तरंगांमध्ये वैश्विक क्ष-किरण स्रोत आणि दूरवर असलेले तारे शोधू शकण्यास सक्षम आहे.


    ग्राहक किंमत निर्देशांकसाठीचा ‘आधारभूत वर्ष’ बदलण्यात आला

    2019-20 या आर्थिक वर्षात नव्या ‘आधारभूत वर्ष’ सोबत सकल स्थानिक उत्पन्न (GDP) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) माहिती निश्चित करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.
    सध्या GDPसाठीचा आधारभूत वर्ष 2011-12 हा आहे आणि CPIसाठी 2012 हा वर्ष आहे. सुधारित आवश्यकतेनुसार आधारभूत वर्ष GDPसाठी 2017-18 आणि CPIसाठी 2018 असा पकडण्याची गरज असल्याने सरकारने हा निर्णय घेतला.
    किंमत निर्देशांक
    भारतात महागाईचे मोजमाप करण्यासाठी सर्वसाधारणपणे घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) असे दोन निर्देशांक वापरले जातात. घाऊक किंमत निर्देशांक हा घाऊक बाजारपेठेतल्या वस्तूंच्या किंमतीवर किंवा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वस्तूंच्या व्यवहारांच्या किंमतीवर आधारित असतो तर ग्राहक किंमत निर्देशांक हा ग्राहक खरेदी करीत असलेल्या किंमतीवर किंवा किरकोळ स्वरूपाच्या होणाऱ्या व्यवहार ज्या किंमतीवर होतात, त्या किंमतीवरून निश्चित केला जातो.
    देशाच्या आर्थिक स्थितीत होणार्‍या बदलांमुळे सुधारित मूल्यांकनासाठी आणि कार्यात फेरबदल करण्यासाठी दर पाच वर्षांमध्ये एकदा आधारभूत वर्ष सुधारले जाते.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 March 2019 Marathi |   
    14 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी



    जागतिक मूत्रपिंड दिन: 14 मार्च

    जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारीला (यावर्षी 14 मार्च) जागतिक मूत्रपिंड दिन पाळण्यात येतो.
    यंदा हा दिन “किडनी हेल्थ फॉर एव्हरीवन एव्हरीव्हेअर” या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आला आहे. या दिनानिमित्त मूत्रपिंडाच्या संबंधी असलेले आजार, आरोग्य सेवांमधली असमानता अश्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यात आले.
    2006 साली पहिल्यांदा जागतिक मूत्रपिंड दिन पाळला गेला. हा दरवर्षी आयोजित केला जाणारा वार्षिक जागरूकता आणि शैक्षणिक कार्यक्रम आहे.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 March 2019 Marathi |   
    14 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment