दैनिक सामान्य ज्ञान | Daily General Knowledge:
एल निनो
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेकडून अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट या काळात 'एल निनो'ची परिस्थिती उद्भवण्याचा अंदाज आहे. भारतात जून ते ऑगस्ट या काळात जवळपास 60 टक्के एल निनो परतण्याचा संस्थेचा अंदाज आहे.भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) कडून प्राप्त माहितीनुसार हवामानाची जी सध्याची स्थिती आहे, त्यावरून असे दिसून येते की कमकुवत एल निनोच्या संदर्भात इशारा करीत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत ही स्थिती राहण्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यात आणि मेच्या शेवटपर्यंत याबाबत स्पष्टता मिळणार. तेव्हाच पावसावरील त्याच्या प्रभावाबाबत स्पष्टता दिली जाऊ शकणार.
एल निनो म्हणजे काय?
डिसेंबर महिन्यात दक्षिण अमेरिकेतील किनारपट्टी भागात प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा अचानक वाढते. त्यामुळे होणाऱ्या हवामानबदलास एल निनो म्हणतात.
एल निनो प्रशांत महासागरात तयार होणारा एक जलवायू चक्र आहे, ज्याचा प्रभाव जगभरातल्या हवामानावर पडतो. हा चक्र तेव्हाच सुरू होतो जेव्हा पश्चिम उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरात गरम पाणी दक्षिण अमेरिकेच्या तटाकडे भूमध्य सीमेबरोबर पूर्वेकडे प्रवाहीत होतो.
‘एल-निनो’ परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात असलेले ताहिती नावाचे बेट आणि पेरू या देशाच्या किनापट्टीजवळून वाहणारा गरम पाण्याचा प्रवाह होय. या गरम पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो चौरस किलोमिटर क्षेत्रफळावरील पाण्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. ही तापमान वाढ एक अंश सेल्सियसपेक्षा कमी असल्यास त्याचा पावसाच्या अंदाजावर फारसा परिणाम होत नाही. परंतु तापमान एक ते दीड अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास पावसाचा अंदाज वर्तविताना या तापमान वाढीचा प्रभाव विचारात घ्यावा लागतो. एल-निनो तीव्र असल्यास तापमान पाच अंश सेल्सियसपर्यंत वाढते. या वाढलेल्या तापमानामुळे प्रशांत महासागरात पाण्यालगतची हवा गरम होऊन तिचे बाष्पात रुपांतर होते व ती उंचावर निघून जाते. त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो.
हिंदी महासागर व प्रशांत महासागर यांच्यावरील हवेचा दाब एकमेकांशी निगडित असल्याने हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. चांगला मोसमी पाऊस पडण्यासाठी हवेचा दाब हा कमी असावा लागतो. त्यामुळे एल-निनो आल्यास मोसमी पाऊस भारत व त्याच्या शेजारील राष्ट्रांत कमी पडतो वा पडतही नाही. हा एल-निनो दरवर्षी येतोच असे नाही.
2017 साली निधन पावलेले हवामानशास्त्रज्ञ देव राज सिक्का यांनी 1982 साली पहिल्यांदा एल निनो घटना आणि भारतीय मान्सून यादरम्यान असलेला संबंध प्रस्तावित केला होता.
एल निनोचा प्रभाव
विकसनशील देश हे शेती आणि मासेमारी यावर अवलंबून आहेत. ज्या देशांच्या सीमा प्रशांत महासागराला जोडलेल्या आहेत, तेथे हा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याचे अनुभव आतापर्यंत आले आहेत.
गेल्या काही वर्षांत एल निनोमुळे पॅसिफिक महासागरातील समुद्राचा पृष्ठभाग उबदार होऊ लागला आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगात आणि मार्गात बदल होत आहे आणि त्याचा ऋतुमानाच्या चक्रावरही वाईट परिणाम घडू लागल्यामुळे बऱ्याच देशात दुष्काळसदृश्य तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होताना दिसून आली आहे.
एल निनोची लक्षणे
अभ्यासानुसार, प्रशांत महासागराचे विषुववृत्तावरील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सतत तीन महिने 0.5 अंश सेल्सियस ते 0.9 सेल्सियसपर्यंत वाढल्यासच एल निनोचा प्रभाव दिसून येतो.
हिंदी महासागराच्या पाण्याचा पृष्ठभाग, तसेच इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियावरील हवेच्या दाबात वाढ होणे. ताहिती, मध्य पूर्व प्रशांत महासागराच्या भागावरील हवेचा दाब कमी होणे. दक्षिण प्रशांत महासागराच्या भागातील ‘ट्रेड विन्डस्‘ म्हणजेच विषुववृत्तीय भागातून वाहणारे वारे कमकुवत असणे आणि त्यांची दिशा पूर्वेकडे असणे. पश्चिम प्रशांत महासागरातले आणि हिंदी महासागरातले उष्ण पाण्याचे प्रवाह पूर्व प्रशांत महासागराकडे पसरणे. त्याचा परिणाम पश्चिम प्रशांत महासागराजवळच्या भागात दुष्काळ आणि कोरड्या पूर्व प्रशांत महासागराच्या भागात पाऊस असा होतो. अश्या अनेक लक्षणांवरून याबाबत निश्चिती करण्यात येते.
उष्ण कटिबंधातील पूर्व मध्य प्रशांत महासागरात सातत्याने पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याने सातत्याने ‘एल निनो’साठी प्रभावी वातावरणनिर्मिती होते. त्यातूनच प्रशांत महासागराकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी होतो. त्याचाच परिणाम पूर्वेकडील उत्तर भागातल्या ऑस्ट्रेलियामध्ये पाऊस होतो. प्रामुख्याने भारत, स्वीडन, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान या देशांवर परिणाम होतो.
#दैनिक_सामान्य_ज्ञान | #Daily_General_Knowledge
El Nino Report by Nature Journal
Global climatic disruptions due to the strong and extended positive phase of the ENSO conditions, or simply El Nino in 2015-16 increased the outbreak of diseases in the regions of its influence, according to a study published in the journal Nature.The scientists analysed certain disease outbreaks in the 2015-16 period and tried to correlate them with higher temperatures and erratic rainfall patterns characteristic of the El Nino.
Highlights of the Report
Major diseases like chikungunya, dengue, malaria, Hantavirus, rift valley fever, cholera, plague and zika are affected by the weather events induced by El Nino.They found that in regions like Southeast Asia, Tanzania, western United States and Brazil — which are generally affected by the El Nino — the spread of diseases came after shifts in rainfall, temperature and vegetation.
There was either excess of droughts or floods in this period which created the environmental conditions that favoured the growth and propagation of disease causing micro-organisms and their carriers.
The study’s analysis indicates that the intensity of disease activity increased by 2.5-28 per cent during El Nino events than in other periods in the affected regions.
Similarly, excess land surface temperatures in Brazil and Southeast Asia aided the spread of dengue. El Nino, in itself, is a difficult phenomenon to track and study, which makes its consequences even more difficult to understand.
What is ENSO?
- ENSO is nothing but El Nino Southern Oscillation. As the name suggests, it is an irregular periodic variation of wind and sea surface temperature that occurs over the tropical eastern Pacific Ocean.
- ENSO affects the tropics (the regions surrounding the equator) and the subtropics (the regions adjacent to or bordering the tropics).
- The warming phase of ENSO is called El Nino, while the cooling phase is known as La Nina.
What is El Nino?
- El Nino is a climatic cycle characterised by high air pressure in the Western Pacific and low air pressure in the eastern.
- In normal conditions, strong trade winds travel from east to west across the tropical Pacific, pushing the warm surface waters towards the western Pacific.
- The surface temperature could witness an increase of 8 degrees Celsius in Asian waters.
- At the same time, cooler waters rise up towards the surface in the eastern Pacific on the coasts of Ecuador, Peru, and Chile. This process called upwelling aids in the development of a rich ecosystem.
Causes of El Nino:
- El Nino sets in when there is anomaly in the pattern.
- The westward-blowing trade winds weaken along the Equator and due to changes in air pressure, the surface water moves eastwards to the coast of northern South America.
- The central and eastern Pacific regions warm up for over six months and result in an El Nino condition.
- The temperature of the water could rise up to 10 degrees Fahrenheit above normal.
- Warmer surface waters increase precipitation and bring above-normal rainfall in South America, and droughts to Indonesia and Australia.
Effect of El Nino:
- El Nino affects global weather. It favours eastern Pacific hurricanes and tropical storms. Record and unusual rainfall in Peru, Chile and Ecuador are linked to the climate pattern.
- El Nino reduces upwelling of cold water, decreasing the uplift of nutrients from the bottom of the ocean. This affects marine life and sea birds. The fishing industry is also affected.
- Drought caused by El Nino can be widespread, affecting southern Africa, India, Southeast Asia, Australia, and the Pacific Islands. Countries dependent on agriculture are affected.
- A recent WHO report on the health consequences of El Nino forecasts a rise in vector-borne diseases, including those spread by mosquitoes, in Central and South America. Cycles of malaria in India are also linked to El Nino.
No comments:
Post a Comment