चाबहार बंदर: भारत, अफगाणिस्तान, इराण यांनी मालवाहतुकीसाठी मार्गांना सहमती दिली
दि. 24 डिसेंबर 2018 रोजी चाबहार येथे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या चाबहार बंदराच्या संदर्भात भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामधील बैठक पार पडली.या बैठकीत भारत, अफगाणिस्तान, इराण या देशांमधील व्यापार करण्यासाठी ठरविलेल्या मार्गांना आणि वाहतुकीच्या मार्गिकांना सहमती देण्यात आली.
या प्रसंगी ‘इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड’ कंपनीने आपले कार्यालय उघडले आणि चाबहार येथे शाहीद बेहेस्ती बंदरावरील कार्यांचा भार आपल्या हातात घेतला आहे.
चाबहार हा इराणमधील सिस्तान आणि बलूचिस्तान प्रांताचा एक शहर आहे. हे एक मुक्त बंदर आहे आणि ओमानच्या खाडीच्या किनार्यावर वसलेले आहे. हे बंदर इराणमध्ये पर्शियन आखाती प्रदेशाच्या बाहेर स्थित आहे आणि या प्रदेशामध्ये सागरी व्यापार विस्तारीत करण्यामध्ये मदत करेल.
भारताने पाकिस्तानमधून जाणारा मार्ग वगळत अफगाणिस्तानाशी थेट संपर्क साधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून चाबहार येथील शाहीद बिहेष्टी बंदर येथे भारत आपले स्थान निर्माण करीत आहे. भारताच्या जलवाहतुक मंत्रालयाने चाबहार बंदर विकास प्रकल्प आणि अनुषंगिक कामे यांच्या अंमलबजावणीसाठी इराणमध्ये एक कंपनी तयार केली आहे.
साक्षरतेची पातळी उंचावली असूनही नोकरीमध्ये महिलांचा कमी सहभाग आहे: ICRIER
सुरभी घई लिखित आणि भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन परिषद (ICRIER) कडून प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, महिलांमधील साक्षरतेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नोकरी करणार्या महिलांच्या संख्येत वाढ होण्यास मदत झाली आहे.अभ्यासात चार प्रमुख घटकांकडे लक्ष दिले गेले आहे, ते म्हणजे – विवाहात शिक्षणाची भूमिका, सामाजिक निकष, शिक्षित महिलांसाठी कमकुवत स्थिती आणि शिक्षणाची गुणवत्ता.
रोजगारासंबंधी आकडेवारीमधून असे दिसून आले आहे की, सन 2011-12 आणि सन 2015-16 या दरम्यानच्या काळात शिक्षण आणि वयोगटामधील सर्व स्तरांवर महिला कामगार शक्तीत वाढ झाली आहे.
30 वर्षे व त्यावरील वयोगटामधील महिलांमध्ये, पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण असलेल्या मात्र नोकरी न करणार्या महिलांची टक्केवारी 62.7% वरुन 65.2% पर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर एकूण कामगार शक्तीत अशिक्षित महिलांची टक्केवारी 67.6% वरुन 70.1% पर्यंत वाढलेली आहे. ही टक्केवारी असा संकेत देते की, शैक्षणिक पातळीत वाढ होऊनही कामगार शक्तीमध्ये महिलांचा सहभाग कमी आहे.
शिक्षणाच्या बाबतीत स्त्री-पुरुष समानता असली तरीही हे घडले आहे. माध्यमिक पातळीवर समान मुले व मुली आहेत आणि महिला दीर्घकाळ शिक्षण घेत आहेत.
केवळ ध्वनीलहरींचा वापर करून शास्त्रज्ञांनी प्रथमच शिवणकाम केले
ब्रिटनमधील ब्रिस्टल विद्यापीठ आणि स्पेनमधील नॅवारा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना केवळ ध्वनीलहरींचा वापर करून घन/द्रव पदार्थाला हवेतच अधांतरी तरंगत ठेवण्यात यश आले आहे. शिवाय एका प्रयोगात या तंत्राच्या सहाय्याने कापडाच्या तुकड्यात एक धागा रोवण्यास प्रथमच यश आले आहे.या तंत्राचा वापर शरीरामधील जखमांना शिवण्यासाठी किंवा अवयवांना लक्ष्य बनविण्यासाठी औषधांच्या लक्ष्यित वितरणासाठी केला जाऊ शकतो.
शास्त्रज्ञांनी लहान स्वरुपात ध्वनीच्या शक्तीच्या सहाय्याने आणि अल्ट्रासोनिक ध्वनिलहरींचे प्रमाण वाढवून, मनुष्याला ऐकू न येणार्या उच्च पिचवर अतिशय भक्कम ध्वनिक्षेत्र (sound field) तयार केले. हे क्षेत्र हलक्या लहान वस्तू हलविण्यासाठी सक्षम आहे.
या प्रयोगात अनेक लहान स्वरुपाच्या अकॉस्टिक ट्वीझरचा वापर करून एक छोटे जाळे तयार करण्यात आले. अल्ट्रासोनिक ध्वनिलहरींचा वापर होत असल्याने या पद्धतीत ऑप्टिकल ट्वीझरमुळे येणार्या अडचणी येत नाहीत. ऑप्टिकल ट्वीझरमध्ये लेझरचा वापर होतो, जे केवळ पारदर्शक माध्यमांमधूनच प्रवास करतात. मात्र अल्ट्रासाऊंड तंत्र वैद्यकीय क्षेत्रात नियमितपणे वापरले जात आहे. शिवाय ध्वनियंत्रे ऑप्टिकल प्रणालींपेक्षा 1,00,000 पट अधिक कार्यक्षम असतात.
ओडिशात ललितगिरी संग्रहालयाचे उद्घाटन झाले
केंद्र सरकारच्या 'पूर्वोदय' दृष्टीकोनाच्या अंतर्गत ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर शहरात 14,523 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन दि. 24 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले गेले.ललितगिरी शहरात ‘पुरातत्व संग्रहालया’चे उद्घाटन केले गेले. सोबतच पुढील प्रकल्पांचे उद्घाटन केले गेले.
- 1212 किलोमीटर लांबीचे पारादीप हैदराबाद पाइपलाइन प्रॉडक्ट प्रोजेक्ट (PHPL) IOCL कडून तयार केले जात आहे.
- जगदीशपूर-हल्दिया-बोकारो-धामरा पाइपलाइन प्रोजेक्ट (प्रधान मंत्री ऊर्जा गंगा प्रकल्प) याच्या 667 किलोमीटर लांबीच्या बोकारो-अंगुल पाइपलाइन भागाची निर्मिती GAIL कडून केली जात आहे.
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) भुवनेश्वर याचे उद्घाटन केले गेले.
आसामात देशातल्या सर्वात दीर्घ 'बोगिबील' पुलाचे उद्घाटन
गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्रा नदीवर देशामधील सर्वात दीर्घ ‘बोगिबील पूल’ (रेल-रोड ब्रिज) उभारण्यात आला आहे आणि याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 25 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आले आहे. तिनसुखिया-नाहरलगून इंटरसिटी एक्सप्रेस या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पुलाचे उद्घाटन केले जाणार आहेत.बोगिबील पूल एकूण 4.94 किलोमीटर लांबीचा आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर हा पुल बांधण्यात आला आहे. आशियातील हा दुसरा सर्वात दीर्घ पूल ठरला आहे.
हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडण्याचे काम करणार आहे. या पुलामुळे आसामच्या तिनसुखिया ते अरूणाचल प्रदेशातील नाहरलगून शहरापर्यंतचा रेल्वेप्रवास 10 तासाहूनही कमी वेळेत होणार.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी 1997 साली या बोगिबील पुलाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर 2002 साली या पुलाचे काम सुरू झाले.
सुशासन दिन: 25 डिसेंबर
भारतात दरवर्षी 25 डिसेंबरला ‘सुशासन दिन’ पाळला जातो.25 डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या देदीप्यमान नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतात हा दिवस ‘सुशासन दिन’ म्हणून पाळण्याचे ठरविण्यात आले.
2014 साली भारतीय जनता पक्षाद्वारे दरवर्षी भारतात 25 डिसेंबरला सुशासन दिवसाच्या रूपात साजरा करण्याची घोषणा केली गेली होती. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून 2017 वर्षापासून भारतरत्न वाजपेयी आणि (मृत) पंडित मदन मोहन मालविया यांचा सन्मान करण्यासाठी ‘सुशासन दिना’ची घोषणा ‘ई-गवर्नेंसच्या माध्यमातून सुशासन’च्या आधारावर केली गेली.
25 डिसेंबर 1924 रोजी जन्मलेले मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील अटल बिहारी वाजपेयी यांचा सुमारे चार दशकांहून अधिक काळचा संसदीय अनुभव आहे. 1957 साली ते प्रथम लोकसभेवर निवडून आले आणि 2004 सालापर्यंत ते संसदेचे सक्रिय सदस्य होते. या काळात ते चार वेगवेगळ्या राज्यांतून (उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि दिल्ली) वेगवेगळ्या वेळी निवडून आलेले एकमेव संसदीय सदस्य आहेत. ते वर्ष 1996-1996 आणि वर्ष 1998-2004 अश्या दोन काळात देशाचे पंतप्रधान होते. 27 मार्च 2015 रोजी त्यांना भारताच्या ‘भारत रत्न’ या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment