Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, May 11, 2018

    May 11 in History | 11 मे दिनविशेष

    Views

    मृणालिनी साराभाई (माहेरच्या मृणालिनी स्वामिनाथन) (११ मेइ.स. १९१८:केरळ - २१ जानेवारीइ.स. २०१६:अहमदाबाद) या एक भारतीय नर्तकी होत्या. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. त्या भरतनाट्यम आणि कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत होत्या. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या त्या पत्‍नी होत. स्वित्झर्लंडला जाऊन तेथे त्यांनी रशियन बॅले व ग्रीक नृत्ये यांचे अध्ययन केले. भारत सरकारने इ.स. १९९२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा सन्मान केला. 

    जागतिक दिवस
    राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : भारत.
    मातृत्व दिन.
    ठळक घटना/घडामोडी
    १८५७ ; पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम – स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
    १८७८ : मराठी ग्रंथकाराचे पहिले संमेलन
    १८८८ ; ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.
    १९२० : स्त्रियांना पदवीपरीक्षेसाठी प्रवेश देण्याचा ऑक्सफर्ड विद्यापिठाचा निर्णय.
    १९२७ : चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते.
    १९५१ : गझनीच्या महंमदने उध्दवस्त केलेया बारा ज्योतिर्लिंगापैकी एक सोमनाथ या मंदिरात शिवलिंग प्रतिष्ठापना डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते झाली.
    १९८७ : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
    १९९८ : भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली.
    जन्म/वाढदिवस
    १८९५ : जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
    १९१४ : ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.
    १९७२ : जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
    १८८९ : जॉन कॅडबरी, इंग्लिश उद्योगपती.
    १८८५ : लोकनेते कृष्णमोहन बंदोपाध्याय.
    १९९३ : शाहू मोडक, अभिनेते.

    No comments:

    Post a Comment