Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, November 9, 2017

    चालू घडामोडी ..-- महाराष्ट्राचे अन्न प्रक्रिया धोरण मंजुरी

    Views

    चालू घडामोडी ..-- महाराष्ट्राचे अन्न प्रक्रिया धोरण मंजुरी

    ..महाराष्ट्राचे 'अन्न प्रक्रिया धोरण' जाहीर..:--

    -- केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान (नॅशनल फूड प्रोसेसिंग मिशन) अंतर्गत सन २०१४-१५पर्यंत अन्न प्रक्रिया उद्योगाला राज्यामध्ये चालना देण्यात येत होती..

    -- सन २०१५-१६ पासून सदर योजनेस केंद्रीय अर्थसाहाय्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला..

    -- त्यामुळे राज्याचे अन्न प्रक्रिया धोरण ठरविण्यात आले व ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी लागू करण्यात आले आहे..

    -- राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देशाची राजधानी दिल्ली येथे शेती क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक वाढविण्यासाठी तसेच शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राचे 'अन्न प्रकिया धोरण 2017' जाहीर केले..

    -- केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने येथे सुरु असलेल्या 'वर्ल्ड फूड इंडिया' कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी विज्ञान भवनातील सभागृह क्रमांक चार मध्ये आयोजित कार्यक्रमात उभय मंत्री महोदयांनी राज्याचे 'अन्न प्रक्रिया धोरण' जाहीर केले..

    अन्न प्रक्रिया धोरणाचा उद्देश

    १.राज्यातील अविकसित क्षेत्रात कृषी उद्योगात गुंतवणूक सतत होत राहील या दृष्टीने प्रयत्न करणे..
    २.शेतकऱ्यांच्या शेतमाल उत्पादनामध्ये वृद्धी करणे व रोजगारांच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे..

     'अन्न प्रक्रिया धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट..-

    १. महाराष्ट्राला अन्न प्रक्रिया उद्योगाचे गंतव्य स्थान बनविणे,

    २. प्रतिवर्षी या उद्योगाचा दुहेरी आकड्यात विकास करणे,

    ३. या उद्योगात शेतकर्‍यांचा सहभाग वाढवून येत्या वर्षात शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे,

    ४. या क्षेत्रात जवळपास लाख कौशल्याधारित मनुष्यबळ निर्माण करणे,

    ५. सकस आहारातून कुपोषणाच्या समस्येवर मात करणे..

    ६. पशुसंवर्धन, सिंचन, उद्योग, वाणिज्य व विपणन इत्यादी शासनाच्या सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून अन्न प्रक्रिया विभागाकडून अन्न प्रक्रिया उद्योगास चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे..

    ७. तसेच राज्याचा कृषी विभाग केंद्राच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या मदतीने अन्न प्रक्रिया उद्योग समूहांचा (clusters) विकास करील..

    -- राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकताना 2010-11 मध्ये देशात महाराष्ट्र अन्न प्रक्रिया उद्योगाच्या नोंदणीत तिस-या क्रमांकावर असल्याचे या धोरणात नमूद आहे..

    -- तसेच, 1991 ते मार्च 2012 पर्यंत राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात 1,039 कोटींची परकीय गुंतवणूक झाली आहे..

    -- या उद्योगाच्या विकासासाठी राज्यात औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने फूड पार्क, वाईन पार्क, फ्लोरीकल्चर पार्क उभारण्यात आले आहेत..

    -- या मुख्यत्वे सातारा, पैठण, वर्धा, औरंगाबाद, नागपूर, बुटीबोरी (नागपूर), विंचूर (ना शिक),पलूस (सांगली) सांगवी (सातारा) येथील फूड पार्कचा उल्लेख आहे..

    -- राज्यात काजू, आंबा, संत्री, टोमॅटो, मसाले, भात, डाळी, सोयाबीन वरील प्रक्रिया उद्योगासाठी विविध क्लस्टर उभारण्यात आले आहे..

    -- राज्य शासनाने वाईन निर्मिती क्षेत्राला लघु उद्योगाचा दर्जा दिला असून वाईन निर्मिती उद्योगातही राज्याने आघाडी घेतली आहे..

    -- राज्यात 35 पेक्षा अधिक वाईनरी असून त्यासाठी 1,500 एकरावर द्राक्ष लागवड केली जाते..

    -- अन्न प्रक्रिया उद्योगाला पूरक अशा 185 तांत्रिक संस्था राज्यात उपलब्ध आहेत..

    No comments:

    Post a Comment