🔹कोहलीने वानखेडेवर रचले अनेक विक्रम
भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर पहिला एकदिवसीय सामना सुरू आहे. विराट कोहलीचा २००वा एकदिवसीय सामना असून या सामन्यात शतक झळकावत कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
कोहलीने आपल्या एकदिवयीस कारकिर्दीमधील ३१वे शतक झळकावले आहे. सचिन तेंडुलकरनंतर (४९ शतकं) सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीने पाँटिंगच्या ३० शतकांचा विक्रम मोडला.
कर्णधार म्हणून कोहलीचे हे वर्षातील ५ वे शतक आहे. या आधी कर्णधार असताना गांगुली, पाँटिंग, स्मिथ आणि डिव्हिलिअर्सने अशी कामगीरी केली आहे.
घरच्या मैदानावर सर्वाधिक १३ वे शतक ठोकत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीच्या पुढे सचिन तेंडुलकर असून त्याने सर्वाधिक २० शतकं घरच्या मैदानावर ठोकली आहेत.
२००व्या सामन्यात शतक करणारा भारताचा पहिला आणि डिव्हिलिअर्सनंतर दुसरा खेळाडू.
२०० एकदिवसीय सामन्यात ३१ शतकांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू. आफ्रिकेचा आमला २६ शतकांसह दुसऱ्या (१५८ सामने) आणि डिव्हिलिअर्स २५ शतकांसह तिसऱ्या (२२५ सामने ) स्थानावर आहे.
न्यूझीलंडविरूद्ध फक्त १७ डावात हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला.
कोहलीआधी डीन जोन्सने १९ , सेहवागने २१ आणि कॅलिसने २३ डावात ही कामगीरी केली होती.
वानखेडेवर शतक ठोकणारा दुसरा खेळाडू. याआधी सचिनने १९९६ मध्ये ११४ धावांची खेळी केली होती. कोहलीने १२१ धावा करत वानखेडेवरील सचिनचा सर्वाधिक ११४ धावांचा विक्रमही मोडला.
पहिल्या १०० एकदिवसीय सामन्यात कोहलीने १३ आणि पुढील १०० एकदिवसीय सामन्यात तब्बल १७ शतकं ठोकली आहेत.
सर्वात कमी डावात ३१ शतकं करण्याचा सचिनचा विक्रम मोडला. सचिनने हा टप्पा २७१व्या डावात साधला होता, तर कोहलीने यासाठी फक्त १९२ डाव घेतले.
कर्णधार असताना कोहलीचे हे १९ वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. कोहलीच्या पुढे पाँटिंग (४१ शतकं) आणि स्मिथ (३१ शतकं) आहेत.

No comments:
Post a Comment