Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, September 11, 2017

    चालू घडामोडी 11 सप्टेंबर 2017( text)

    Views
    चालू घडामोडी 11 सप्टेंबर 2017

    न्यूयॉर्क : स्पेनच्या राफेल नदालने दक्षिण आफिक्रेच्या केविन अँडरसनवर शानदार मात करुन अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे.

    ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीत अव्वल टेनिसपटू असलेल्या नदालने केविन अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी सरळ सेट्समध्ये मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आपली जादू कायम ठेवली आहे.

    2013 नंतर राफेल नदालचे हे एकाच वर्षातील दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. राफेल नदालचं कारकीर्दीतील आतापर्यंतच सोळावं ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहे.

    राफेल नदाने आधी 2010 आणि 2013 मध्ये अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावलं होतं. आता 2017 चं यूएस ओपन विजेतेपद आपल्या नावावर केलं.तर केविन अँडरसन हा अमेरिकन ओपनच्या इतिहासात फायनलमध्ये धडक मारणारा दक्षिण आफ्रिकेचा गेल्या 52 वर्षांमधला पहिला शिलेदार आहे. क्लिफ ड्रायसडेलने 1965 साली हा पराक्रम गाजवला होता. पण मॅन्युएल सन्तानाकडून झालेल्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेला अमेरिकन ओपनचं विजेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरला होता.

    तर 1981 साली दक्षिण आफ्रिकेच्या योहान क्रीकने ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं.

    No comments:

    Post a Comment