चालू घडामोडी - 25 जानेवारी
Wed, 25 Jan 2017 : Govind Padviमहाराष्ट्र
गणित विषयक साहित्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर# राज्यातील मुले गणितात कच्ची असल्याची ओरड होत असताना गणितविषयक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यासाठी तब्बल 10 कोटींची तरतूद शिक्षण विभागाने केली आहे. ठोकळा पद्धतीचा वापर करून सहजसोप्या पद्धतीने गणित शिकवण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला होता. मात्र, साहित्य मिळवण्यासाठी आर्थिक अडचण असल्याची खंत शाळांच्या प्रतिनिधींनी मांडली होती. त्यावर साहित्य देण्यासाठी तब्बल 10 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
राष्ट्रीय
विराट कोहली, साक्षी मलिकला पद्मश्री
# प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांची घोषणा आज (बुधवार) सरकारकडून करण्यात आली असून, क्रिकेटपटू विराट कोहली, ऑलिंपिक पदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्यासह अन्य काही जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
क्रीडा
पंकज अडवाणी सातव्यांदा राष्ट्रीय स्नूकर चॅपिंयन# १५० अप फॉर्मेटमध्ये विश्व चॅपिंयन बनलेला भारताचा बिलियर्ड व स्नूकर स्टार खेळाडू पंकज आडवानी याने त्याच्या यशात आणखी एक तुरा खोवला आहे. येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बिलियर्ड व स्नूकर स्पर्थेत त्याने सातव्यांदा चॅपियनशीप मिळविली आहे.



No comments:
Post a Comment